नाशिकरोड वासियांना लवकरच शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडवासियांना लवकरच शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. नाशिक रोड विभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे दारणा नदीतील रॉ वॉटर चेहेडी पंपिंग स्टेशन येथून उचलून शुद्धीकरण करून पिण्याकरिता पुरविले जात आहे चेहेडी पंपिंग स्टेशन हे दारणा व वालदेवी नदीच्या संगमाजवळ असल्याने वालदेवी नदीला रोटेशन सुटल्यानंतर पंपिंग द्वारे उचलून शुद्धीकरण करून दिले जात आहे.

परंतु वालदेवी मधील साचलेल्या पाण्यात अळया तयार होऊन पाणी उचलण्याच्या ठिकाणापर्यंत येत असल्याने व तेच  शुद्धीकरण करून नाशिक रोड वासियांना पिण्याकरिता  पुरविण्यात येत असल्याने त्यामध्ये अळया मिश्रित पाणी येत असल्या याबाबत नासिक रोड प्रभागातील नगरसेवकांनी बऱ्याच वेळा महासभेत प्रश्न उपस्थित करून नाशिक रोड वासियांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता आग्रही भूमिका घेतल्या कारणाने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी सभागृहनेते सतीश बापू सोनवणे यांचेसह नाशिक रोड मधील सदस्यांसमवेत चेहेडी पंपिंग चा पाहणी दौरा केला होता समक्ष पाहणी केल्यानंतर प्रशासना समवेत झालेल्या चर्चेत सर्वात प्रथम गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान 800 मिलिमीटर व 600 मिलिमीटर व्यासाची पी एस सी पाईप लाईन 2001 साली टाकण्यात आली तिला आजमितीस वीस वर्ष होत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लिकेज होणे पाईप फुटणे यासारखे प्रश्न उपस्थित होऊन पाणीपुरवठ्याला अडचण येत असल्याने अळ्या मिश्रित पाणी नाशिकरोड वासियांना द्यावे लागते त्याकरता पुढील तीस वर्षाचे  नियोजन गृहीत धरून सदर पाणीपुरवठा पाईपलाईन याचा अभ्यास करून सल्लागार मार्फत प्रस्ताव  ठेवण्यासाठी महापौर यांनी आदेशित केले असता तांत्रिक सल्लागार संचालक वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई यांनी अभ्यास करून अहवाल ठेवला असता त्यांनी दोन पर्याय ठेवले 1 गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत 900 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन टाकने आवश्यक असून ते काम हाती घेणे बाबत सूचित केले त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत पाईप लाईन टाकने याचा विचार करण्यात यावा यामधील प्रथम टप्प्यातील गांधिनगर जलशुद्धीकरण केंद्र ते  नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत 900 मिलिमीटर व्यासाची डीआय पाईपलाईन याकरिता प्राकलन 19 कोटी रुपये पर्यंत जात असल्याने सदरचा प्रस्ताव माहे डिसेंबरच्या महासभेमध्ये ठेवण्यात आला असता सदरच्या कामास महापौर यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

सदरचे कामाचा खर्च हा सन 2020 -21 मध्ये जलदाय व्यवस्था प्रकल्प याअंतर्गत ५ कोटीची तरतूद करण्यात आली असून उर्वरित खर्च हा सण 2021 -22 च्या अर्थसंकल्पात करण्यात यावा असेही नमूद करण्यात आले आहे सदरचे काम प्रशासनाने तातडीने ई निविदा मागवून करणेकरीता महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त यांना आज दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी पत्र देऊन यासंदर्भात तातडीने प्रशासनाने कार्यवाही करून नाशिक रोड वासियांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्याकरिता सुचित केले आहे त्या कारणाने नाशिक रोड वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत्या आर्थिक वर्षात मार्गी लागणार असल्याचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790