नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): उन्हाळी सुट्टयांमुळे मुंबईकडून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने मध्य रेल्वे मुंबई (पनवेल) ते छपरा दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार असून तिच्या दोन्ही बाजूने एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. ही सेवा १८ एप्रिल ते २८ जूनपर्यंत राहणार आहे.
या विशेष रेल्वेला १४ वातानुकूलित बोगी- तृतीय इकॉनॉमी, तीन शयनयान, ४ सेकंड सिटिंग बोगी राहणार आहे. तिकीट रेल्वेस्थानकासह ऑनलइन आरक्षित करता येणार आहे. नाशिकसह इतर थांबे कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर आणि बलिया.
गाडीचे वेळापत्रक असे:
👉 पनवेल: दर शुक्रवारी : रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुटणार.
👉 नाशिकरोड: रात्री १२.१५ ला पोहचणार
👉 छपरा: तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी पोहचणार.
👉 छपरा: दर गुरुवारी : दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुटणार
👉 पनवेल: दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार.