🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत तज्ज्ञ समितीद्वारे सकारात्मक मार्ग काढणार

मुंबई। दि.२६ फेब्रुवारी २०२६: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आरेखनामुळे जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण ऑब्जर्व्हेटरीच्या अँटेनाला व्यत्यय येत असल्याने या रेल्वे मार्गाच्या मर्यादित बदलासाठी विशेष तज्ज्ञांची समिती नेमून याप्रकरणी सकारात्मकपणे मार्ग काढला जाईल. या मार्गाची पर्यायी आखणी करून या मार्गातील सुटलेली गावे रेल्वे मार्गास जोडली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  स्टार्ट अप्स आणि उद्योजकांनी सामाजिक सेवाधारित उपक्रमात सहभाग द्यावा- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सदस्य सत्यजित तांबे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मार्गाबाबत केंद्र शासनासोबत दोन बैठका झाल्या आहेत. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आरेखनामुळे जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणी ऑब्जर्व्हेटरीच्या अँटेनाला व्यत्यय येत आहे. ३२ देशांच्या सहभागाची ही आंतरराष्ट्रीय ऑब्झर्व्हेटरी असल्याने तिच्या नियमावलीत बदल करणे शक्य नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: पूर्वतयारीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाची आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या मार्गाच्या पर्यायी आखणी बाबत व्यवहार्यता, तांत्रिक बाबी याचा सखोल अभ्यास समिती करेल. तसेच याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790