नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात बेशिस्त रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉटसअप नंबरवर प्राप्त झाल्या होत्या.
त्यानंतर सोमवारी एकूण ३३९ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करत पोलिसांनी १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वाहतूक विभागाच्या पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड विभागाकडून विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे, काळ्या फिल्म, बेशिस्त पार्किंग, रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
सोमवारी दिवसभरात सीट बेल्ट न लावता कार चालविणाऱ्या १२० चालकांकडून २८ हज्जार ४०० आणि मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चालकांकडून १० हजार दंड वसूल करण्यात आला.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790