नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात मॉडिफाईड सायलेंसर लावून कर्णकर्कश्शआवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ कार्यक्षेत्रात दि. १४ ते २१ मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कर्णकर्कश्श आवाज करणारे दुचाकींचे सायलेंसर जप्त करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण १११ मॉडिफाईड सायलेंसर जप्त करण्यात आले.
या जप्त केलेल्या सायलेंसर्सचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून आज (दि. २२ मार्च २०२३) परिमंडळ-१ कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेंसरवर रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहेत.
यापुढेदेखील ही कारवाई अशीच सुरु राहणार असून कर्णकर्कश्श आवाज करणारी वाहने तसेच चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले
पोलिस ठाणे निहाय कारवाई:
आडगाव पोलीस ठाणे: ०८, म्हसरूळ पोलीस ठाणे: १४, पंचवटी पोलीस ठाणे: ११, सरकारवाडा पोलीस ठाणे: ११, भद्रकाली पोलीस ठाणे: १५, मुंबई नाका पोलीस ठाणे: २७, गंगापूर पोलीस ठाणे: २५
![]()


