नाशिक: गुटख्याची तस्करी करणार्‍या दोघांना अटक; तब्ब्ल ३९ लाखांचा गुटखा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): मध्यप्रदेश-इंदोर येथून मुंबईकडे चोरट्या मार्गाने गुटख्याची तस्करी करणार्‍या आयशर वाहनाचा वणी – पिंपळगाव मार्गावर पहाटे दोन वाजेच्या दरम्यान सिनेस्टाइल पाठलाग करून 39 लाख 34 हजार रुपये किमतीचा गुटखा पकडला असून या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयशर वाहनामध्ये (क्रमांक डि.डि.01/जी 9092) सुगंधी पानमसाला आणि इतर कंपनीच्या गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्त माहितीदाराने वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांना दिली. या माहितीच्या आधारे निलेश बोडखे व त्यांच्या सहकार्‍यांनी वणी पिंपळगाव रोडवर रात्री सापळा रचला.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

मध्यप्रदेश येथून आलेले आयशर वाहन क्रमांक (डि.डि.01/ जी 9092) हे वणी पोलिसांच्या हद्दीतील दिसून आले असता आयशर चालकाला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत आयशर जोरात पिंपळगाव दिशेने पळविला.

वणी ते पिंपळगाव रोडवर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 19 लाख 24 हजार रुपये किमतीच्या विमल व राजनिवास गुटख्यासह 2 लाख दहा हजार रुपये किमतीचा पास्ता व आयशर वाहन 18 लाख रुपये असा एकूण 39 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी मिळून आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

वणी पोलिसांनी मांगिलाल हरीसिंग डांगी (25) चालक रा. बडवेली, ता. खिलचीपुर, जि. राजगड, म.प्र. व बने बाबुलाल सिंग (33) क्लिनर रा. बडागाव, ता. नलखेडा, जि. अगर मालवा, बंदगो, शहाजापुर म.प्र. यांना अटक केली आहे. सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक संजय बांमळे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे, क्राईम अंमलदार युवराज खांडवी, पो. ना. निलेश सावकार, पो. ना. बंडू हेगडे, धनंजय शिलावटे यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790