नाशिक पोलिस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांचे जम्बो फेरबदल!

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या विनंती अर्ज आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. आठवडाभरापूर्वीच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील प्रभारी निरीक्षकांमध्ये जम्बो फेरबदल करीत दणका दिला होता. तर, बुधवारी (ता.१४) पुन्हा आयुक्तांनी आयुक्तालयांतर्गत पोलिस ठाणे व विविध शाखांच्या पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांमध्ये फेरबदल केले आहेत तर काहींचे विनंती अर्ज फेटाळून लावले आहेत.

पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे आयुक्तालयातील सिंहस्थ कुंभमेळा कक्षात नियुक्ती करण्यात आली असून, दंगल नियंत्रण पथकाचा अतिरिक्त भारही त्याच्याकडे कायम आहे. पीसीबी-एमओबीतून अभियोग कक्षात बदली करण्यात आलेले पोलिस निरीक्षक सुभाष पवार यांची शहर वाहतूक शाखेच्या युनिट चारमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, पीसीबी-एमओबीतील उपनिरीक्षक पंडित अहिरे यांची नाशिक रोड पोलिस ठाण्यात बदली केली आहे. नगर येथून हजर झालेले राजेश काळे यांची शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

त्याचप्रमाणे, विनंतीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक माया गावडे यांची चुंचाळे पोलिस चौकीत, महिला उपनिरीक्षक नेहा सोळंके यांची गंगापूर पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात, सातपूर पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक मोनालिया मोरे यांची एका वर्षाकरिता महिला सुरक्षा विभागात तर, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांची जलद प्रतिसाद पथकात नियुक्ती करण्यात आलेली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

असे आहेत फेरबदल (कंसात नियुक्तीचे ठिकाण):
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राकेश हांडे (मुदतवाढ), दिनकर कदम (अभियोग कक्ष), संदेश चकोर (नियंत्रण कक्ष), सहायक निरीक्षक विलास घिसाड (सरकारवाडा), गौतम सुरवाडे (पंचवटी), चंद्रकांत सपकाळे (भद्रकाली), सचिन चौधरी (सातपूर), महिला सहायक निरीक्षक अश्विनी पाटील (सरकारवाडा), शांताराम महाजन (गंगापूर), प्रवीण माळी (पीसीबीएमओबी), उपनिरीक्षक सुहासिनी बारेला (सातपूर), भटू पाटील (अंबड), मोतीलाल पाटील (गंगापूर), किरण शेवाळे (उपनगर), तेजश्री यादव (प्रशिक्षण शाखा), रमेश पवार (शहर वाहतूक शाखा), राजेंद्र वाघ (शहर वाहतूक शाखा), दिलीप मते (शहर वाहतूक शाखा), सैयद जियाबोद्दीन (नियंत्रण कक्ष).

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

यांचे विनंती अर्ज फेटाळले: पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक निरीक्षक सागर डगळे, सुखदेव काळे, शांताराम डंबाळे, महिला उपनिरीक्षक मिताली कोळी, शेख निसार अहमद शरीफ, धनराज पाटील, पंकज सोनवणे, रोहित गांगुर्डे, वैशाली भाबड, वसंत लांडे, जितेंद्र माळी, रामदास सानप, सविता उंडे, अजिनाथ बटुळे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here