नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मकरसंक्रांतीच्या औचित्यावर शहरात पतंगोत्सव साजरा केला जातो. तरुणाईकडून पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. यासाठी नायलॉनच्या मांजाचाही बेसुमार वापर केला जातो.
मात्र, या नायलॉन मांजाला काचेची कोटिंग केलेली असते. यामुळे मानवी जीवितासह पक्षी, प्राण्यांचाही जीव धोक्यात सापडतो. अनेकदा मांजामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या तसेच मांजामुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, वापरावर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन करणान्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून नाशिकमधून तडीपार, हद्दपार करण्यात येणार आहे.
नायलॉन माजाचा वापर पतंगोत्सवात कोणीही करू नये, नाशिककरांनी पर्यावरणपूरक संक्रांत साजरी करत पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी साधा दोरा वापरावा. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
२६ डिसेंबर २०२२ ते २३ जानेवारी २०२४ पर्यंत मांजाचा नायलॉन वापर करण्यासह विक्री निर्मितीवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९७१ च्या कलम ३७ नुसार बंदी घालण्यात आली आहे.
पर्यावरणासाठी हानिकारक ठरणाऱ्या नायलॉन मांजाला काचेची धारधार व टोकदार अशी कोटिंग केलेली असते. यामुळे मनुष्यासह पक्ष्यांनाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याच्या घटना यापूर्वीही शहरात घडलेल्या आहेत.
नायलॉन मांजामुळे गळे कापले २ गेल्याने मृत्यूही ओढावला आहे. यामुळे नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, तसेच चोरीछुप्या पद्धतीनेही विक्री करू नये आणि विक्रीच्या उद्देशाने साठाही करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.