नाशिक: कसाराजवळ पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ येत असतानाच कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी पुढे गेले. आज (दि. ६ जुलै) रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. काही अंतरावर जावून इंजिन व एक बोगी थांबल्यामुळे अनर्थ टळला.

पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक बोगी पुढे निघून गेली. ही बाब लक्षात येताच तातडीने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर इंजिन पुन्हा मागे घेण्यात आल्यावर कपलिंग बसवण्यात येऊन गाडी पुढे कल्याणच्या दिशेने रवाना झाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790