नाशिक (प्रतिनिधी): डी.गुकेश विश्वविजेते ठरल्याचा, आनंद साजरा करण्याचा हेतूने, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि त्र्यंबकेश्वर तालुका बूद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने एक दिवशीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवारी २९ डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील जैन हॉल येथे ही स्पर्धा संपन्न होईल. ७ वर्षाखालील,९ वर्षाखालील, ११ वर्षाखालील, १५ वर्षाखालील तसेच खुल्या गटात ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
एकुण १०,०००ची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे स्पर्धेत खेळण्यासाठी आधी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी- माधव चव्हाण: 9689588765, 9527712062, विक्रम मावळंकर: 9371502003, विनायक वाडीले: 8888119335, सुमित शाह: 9822660909 यांच्याशी संपर्क साधावा.
खेळाडुंनी मोठ्या संख्येने सहभागी होवून, नववर्षाचे स्वागत करत डी.गुकेश यांच्या अजिंक्यपदाचा आनंद साजरा करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.