नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पालिकेने डेंग्यू उत्पत्तीस्थळ असलेल्या १०५८ नागरिकांसह आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच नाशिकरोडच्या गोसावीवाडीतील सांडपाणी नाल्यावर ३ ठिकाणी अनधिकृतपणे बांध बांधून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने निर्माण केल्याप्रकरणी वैद्यकीय विभागाने नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांना नोटीस बजावली आहे.
शहरातील डेंग्यू नियंत्रणामध्ये आलेला नाही. ऑक्टोबरमध्ये १९३ बाधितांची नोंद झाली होती. नोव्हेंबरमध्ये २७२ नवीन रुग्णांची भर पडली आहे, त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बळींचा आकडा ३ झाला आहे. पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही डेंग्यू नियंत्रणामध्ये नसल्याचे आरोप होत असून खासगी रुग्णालयांमध्ये तर रुणांची संख्या कित्येक पटीने अधिक असल्याचे वैद्यकीय विभागाचे खाजगीत म्हणणे आहे.
रेल्वे प्रबंधकांसह नोटीस:
डेंग्यू उत्पत्तीस कारणीभूत ठरत असल्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांनसह नोटीस बजावली आहे. तर शहरातील अर्धवट बांधकाम प्रकल्पांची माहिती नगररचना विभागाकडून मागविण्यात आली आहे. – डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख
बांधकाम स्थळांची मागवली माहिती:
पालिकेने गेल्या वर्षात मंजूर केलेले बांधकाम प्रकल्प, बांधकाम व्यावसायिकाचे नाव, त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मागवले आहेत. या बांधकाम प्रकल्पांवर अळ्या आढळल्यास नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई होणार आहे. नागरिकांसह सरकारी आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसाठी नागरिक, बांधकाम व्यावसायिक, शासकीय कार्यालये आणि निमसशासकीय कार्यालये असे जवळपास १०८ जणांना नोटिसा दिल्या आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790