नाशिक: प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक कारवाईत २५ हजार रुपयांचा दंड वसूल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या ५ दुकानदारांवर पंचवटी परिसरात कारवाई करण्यात आली आहे. पंचवटी परिसरात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत या कालावधीत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत व्यापक मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महापालिका यांच्या मार्फत राबविली जात आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: निसर्गवेधी पक्षीमित्र आनंद बोरा यांना एनसीएफचा ‘आऊटस्टडींग सिटीझन’ पुरस्कार !

पंचवटीतील मोहिमेत ५३ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५ दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. सिंगल यूज प्लॅस्टिक वापर करताना आढळून आल्याने प्रत्येकी ५००० प्रमाणे एकूण २५००० दंड ठोठावण्यात आला आहे. विभागीय अधिकारी मदन हरीचंद्र, विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790