धक्कादायक: पत्नीने केली मुलाच्या मदतीने पतीची हत्या; नाशिक शहरातील घटना

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील इंदिरानगर परिसरात पत्नीने मुलाच्या मदतीने डोक्यात मुसळी घालून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे….

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाजी गवळी (४१) (रा. समृद्धी प्लाझा, यशवंतनगर, दामोदर चौक, पाथर्डी फाटा, मुळगाव साक्री जि धुळे) असे खून मयत व्यक्तीचे नाव आहे.

सदर मयत व्यक्तीचे त्याच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी व त्यांच्यात नेहमी भांडण होत होते .

⚡ हे ही वाचा:  नाशिक मनपाची मोठी कारवाई; नाशिकरोड, पंचवटी व सिडको परिसरातील ९५ ठिकाणी अतिक्रमण हटविले

काही दिवसांपूर्वी दोघांमधील वाद मिटविण्यात आले होते. मात्र, मयत व्यक्तीची पत्नी आणि संशयित आरोपी सुनीता गवळी (४०) आणि तिचा मुलगा निशांत गवळी (२०) यांनी तो राग मनात धरून दादाजी गवळी हे बेडरूममध्ये गाढ झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात मुसळीने वार करून त्यांचा खून केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोकाची कारवाई

त्यानंतर सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी स.पो.आ.अंबादास भुसारे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित मायलेकाला ताब्यात घेतले आहे. तर या खुनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शंकरसिंग राजपूत करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790