Engineering Diploma : डिप्‍लोमाची गुणवत्ता यादी 21 जुलैला; नोंदणीस मुदतवाढ

Engineering and Technology Diploma : दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना येत्‍या शनिवार (ता.१५) पर्यंत नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

येत्‍या २२ जुलैपासून कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होणार असून तत्पूर्वी २१ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता पदविका अभ्यासक्रमाची नोंदणी सुरु आहे. नाशिक विभागात २२ हजार जागा उपलब्‍ध असताना त्‍यापेक्षा अधिक अर्ज यापूर्वीच दाखल झालेले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्‍यातच नोंदणीला मुदतवाढ मिळाल्‍याने आणखी विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल होणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शनिवार (ता.१५) पर्यंत नोंदणी करता येईल. ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीच्‍या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

यापूर्वीपर्यंत केवळ नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु आता सविस्‍तर वेळापत्रक जाहीर झाले असल्‍याने नोंदणीस आणखी मुदतवाढ मिळणार नसल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे.

१७ ला तात्पुरती गुणवत्ता यादी:
नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर येत्‍या १७ जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीसंदर्भात तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी १८ व १९ जुलै अशी मुदत दिली जाईल.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

यानंतर २१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्‍याआधारे पुढील प्रवेश फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. तीन फेऱ्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

१७ ऑगस्‍टपासून अध्ययन:
गेल्‍या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. परंतु आता यंदापासून हे वेळापत्रक पूर्वपदावर येत आहे. त्‍यानुसार आता पदविका अभ्यासक्रमाच्‍या अध्ययन प्रक्रियेला १७ ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे. ८ सप्‍टेंबरपर्यंत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

असे आहे कॅप राउंडचे वेळापत्रक:

* पहिल्‍या राउंडसाठी पसंतीक्रम नोंदणी: २३ ते २६ जुलै

* पहिल्‍या राउंडची जागा वाटप: २८ जुलै

* निवड झालेल्‍यांना प्रवेशाची मुदत: २९ जुलै ते ३ ऑगस्‍ट

* दुसऱ्या राउंडसाठी पसंतीक्रम नोंदणी: ६ ते ८ ऑगस्‍ट

* दुसऱ्या राउंडसाठी जागा वाटप: १० ऑगस्‍ट

* निवड झालेल्‍यांना प्रवेशाची मुदत: ११ ते १६ ऑगस्‍ट

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790