नाशिकच्या राजकारणातील मोठी बातमी! दिलीप दातीर यांचा मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

नाशिकच्या राजकारणातील मोठी बातमी! दिलीप दातीर यांचा मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी नुकताच शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये 2012 मध्ये सत्ता मिळवली होती, त्यानंतर पक्षाची अवस्था बिकट असली तरी गटबाजी मात्र थांबलेली नाही. त्यातच आता मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपल्याला पद मुक्त करावी अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसे प्रवेश केला होता. 2019 मध्ये मनसेच्या माध्यमातून पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना राज ठाकरे यांनी शहराध्यक्षपदी नियुक्त केले होते.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

दरम्यान दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपल्याला पद मुक्त करावी अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे. यावर दिलीप दातीर यांच्याशी संपर्क साधला असता आपला व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा दिला असून आपण पक्ष सोडलेला नाही पुढील आठवड्यात आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790