🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: सदनिका फसवणूक प्रकरण: नरेश कारडा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

नाशिक। दि. ७ डिसेंबर २०२५: फ्लॅटधारकांचे फ्लॅट परस्पर तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून त्यांना खरेदी खत न देता तक्रारदार सेवानिवृत्त सैन्य अधिकारी यांच्यासह अन्य फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.६) दुसऱ्यांदा त्यांना बुधवारपर्यंत (दि.१०) वाढीव पोलिस कोठडी सुनावली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध वाहतूक मार्गात बदल

संसरी गावातील हरि निकेतन (फेज-२) गृह प्रकल्पामधील फ्लॅटधारकांनी संपूर्ण रक्कम कारडा इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक संशयित नरेश कारडा यांच्याकडे अदा केली होती; मात्र फ्लॅटधारकांना त्यांनी अद्याप खरेदीखत तयार करून दिले नाही. दरम्यान, कॅप्रीग्लोबल नावाच्या फायनान्स कंपनीच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करत फ्लॅट तारण ठेवून सुमारे २३ कोटी रुपयांचे कर्ज काढले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; मुद्देमाल जप्त !

यामुळे कंपनीने त्या फ्लॅटचा जाहीर लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करणार असल्याच्या नोटिसा फ्लॅटधारकांना देण्यात आल्या होत्या. यामध्ये तक्रारदार सेवानिवृत्त कर्नल विक्रम आदित्य यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून कारडा व कॅप्रीग्लोबल या संस्थेविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790