
नाशिक (प्रतिनिधी): मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला. या दौ-या दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, सहायक संचालक नगररचना कल्पेश पाटील, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उप आयुक्त अतिक्रमण मयुर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
राम काल पथ हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील महत्वपुर्ण प्रकल्प आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वॉर रुम मधील महत्व पुर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने रामकुंड, पंचवटी परिसरातील विविध अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमण, हातगाडी वाले, भाजी वाले, अनियंत्रित वाहतुक, अनियंत्रित पार्किंग, नदी मध्यें धुतली जाणारी वाहने , कपडे या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे तसेच परीसराचे पौराणिक महत्व , धार्मिक महत्व टिकविणेच्या दृष्टीकोनातून राम काल प्रकल्पातील अ़डी अ़डचणी समजून घेणे प्रकल्प विकसित करणे कामी नगर नियोजन विभाग यांनी सदर परिसरातील अनाधिकृत बांधकामे, नदी परीसरातील बांधकामे यांचे सर्वेक्षण करणे व यादी तयार करणे, जाहिरात व परवाना विभाग यांना अधिकृत- अनाधिकृत विक्रेते यांची माहिती संकलित करणेचे निर्देश आयुक्त खत्री यांनी या पहाणी दौऱ्यात दिले.
प्रस्तावित रामकाल पथ परिसरात विविध ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कामे आवश्यक आहेत, यासाठी अहिल्या बाई होळकर पुला पासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत व तेथून राम मंदिरा पर्यंत गरजेच्या दोनही बाजुंच्या इमारती, रस्ते या ठिकाणी कोणती कामे करणे आवश्यक आहे, कोणती कामे करता येतील, रस्त्यांमधील इलेक्ट्रीक पोल हलविणे. त्याच प्रमाणे गणेश वाडी येथे विनावापर पडून असलेले भाजी मार्केट वापरण्याजोगे करणेकामी परिसरातील किरकोळ विक्रेते यांना सदर ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयी चर्चा करून या भागाची पाहणी केली.
नदी परिसरातील अस्तित्वातील पुल रामकुंड व लक्ष्मण कुंड येथील पुल राम सेतु पुल व इतर सांडवे यांची पाहणी करून कमकुवत झालेले पुल भविष्यातील गर्दीच्या दृष्टी कोणातून धोकेदायक ठरू नये यादृष्ठीने काय उपाय योजना करता येतील याची पाहणी या दौऱ्यात केली. मिरवणुक मार्ग कशा पध्दतीचा असेल भाविक कोणत्या ठिकाणी थांबतील, कोणत्या मार्गाने जातील, भाविकांना गोदावरीत स्नान करण्याच्या ठिकाणी कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील या अनुषंगाने काय कामे करावी लागतील याची पाहणी केली.
रामकुंड – नदी परिसरात स्मार्ट सिटी मार्फत केलेली कामे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत करणेत येणारी नवीन कामे याची सांगड कशी घालता येऊ शकेल याची पाहणी केली, या परिसरातील अस्तित्वातील शौचालय नुतनीकरणेच्या अनुषंगाने काय कामे करता येऊ शकतील रामकुंड परिसराचे नुतनीकरण संबंधाने कोणकोणती कामे करता येऊ शकतील, गांधी तलाव, रामकुंड व इतर बंधारे याठिकाणी बसविणेत आलेले गेट व नादुरुस्त गेटची पाहणी केली.
सिंहस्थ कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त आपत्कालीन मार्ग म्हणून होळकर पुलाच्या डाव्या बाजुस पाय-या करता येऊ शकतील काय या बाबत पाहणी केली. या परिसरात येणारी वाहने नो प्लास्टिक झोन, नो व्हेईकल झोन करणे कामी इतर ठिकाणी मुबलक पार्किग जागा व व्यवस्था निर्माण करणेच्या अनुषंगाने नवीन पार्किंगची ठिकाण विकसित करणे कामी आढावा घेण्यात आला.
नाशिक शहरासाठी काळाराम मंदिराचे पौराणिक महत्व लक्षात घेता तसेच साधुमहंत यांचा काळाराम मंदिराशी असलेला जिव्हाळा लक्षात घेता मंदिराच्या सभोवताली, राम काल पथचे अनुषंगाने काळाराम मंदिर परिसरातील पार्किंगच्या अनुषंगाने काही जागांचे संपादन करणे आवश्यक असल्याने पाहणी करणेत आली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790