नाशिक। दि. २१ जून २०२५: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र- २०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा दि. २८ जून ते २३ जुलैदरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रांवर संचलित होणार आहे.
यामध्ये एकूण ८०,६५४ विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ट होणार आहे. हिवाळी २०२४ टप्पा-४ मधील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याआधी पाठविण्यात आलेल्या
होत्या. तसेच ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून तपासण्याचे कार्यही यापूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षेतील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले. सर्व परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ९ वाजता तसेच दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता परीक्षा केंद्रावर यावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे.
![]()

