नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२५: दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (रा. प. महामंडळ) नाशिक विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त एसटी फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
नाशिक, मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवला, इगतपुरी, लासलगाव, पेठ, आणि पिंपळगाव येथील आगारांतून विविध मार्गावर अतिरिक्त बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक-शिवाजीनगर आणि नाशिक-धुळे या मार्गावर दर १५ मिनिटांनी, तर नाशिक संभाजीनगर (येवला मार्गे), नंदुरबार व सटाणा मार्गावर दर अर्ध्या तासाने बस उपलब्ध राहील. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व नियमित व अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षणही सुरू करण्यात आल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले. यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘आवडेल तेथे प्रवास’ पास योजनेत दरकपात:
रा. प. महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेंतर्गत ४ दिवस व ७दिवसांच्या पासच्या दरात कपात केली आहे. नवे दर दिनांक ८ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत पर्यटनासाठी बाहेर गावी जाणारे प्रवासी या योजनेचा लाभघेऊ शकतील, अशी अपेक्षा ‘एस.टी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
👉 अतिरिक्त फेऱ्यांचे मार्ग:
नाशिक आगारातून : चोपडा, धुळे, संभाजीनगर, बोरिवली, वापी, नंदुरबार, जळगाव, पाचोरा, सप्तशृंगगड, त्र्यंबक आणि शिर्डी.
मालेगाव आगारातून : छत्रपती संभाजीनगर, शिवाजीनगर.
सटाणा आगारातून : नंदुरबार, जळगाव शिवाजीनगर.
नांदगाव आगारातून : अहिल्यानगर, शिर्डी, पाचोरा, छत्रपती संभाजीनगर
इगतपुरी आगारातून : धुळे, नंदुरबार, कसारा.
लासलगाव आगारातून : कळवण, नाशिक, सप्तशृंगगड.
पेठ आगारातून : अहिल्यानगर, शिर्डी, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर.
पिंपळगाव आगारातून : नंदुरबार, शिरपूर, धुळे.
याशिवाय नाशिक-सटाणा, नाशिक-बोरिवली, नाशिक-सप्तशृंगगड, नाशिक-त्र्यंबक, नाशिक-शिर्डी या मार्गावर विद्युत बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
![]()

