नाशिक: गंजमाळला विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या ११ केव्ही गंजमाळ विद्युत वाहिनीवर आज (दि. २ जुलै) मोठे झाड पडल्यामुळे ४ विद्युत खांब कोसळले  आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

त्यामुळे सारडा सर्कल ते मुंबई नाका या परिसरातील 20 रोहित्र बंद  झाले असून जवळपास १, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शतपावली करतांना पाय घसरून नाल्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू...

या ठिकाणी महावितरणचे अभियंते व जनमित्र कार्यरत असून विद्युत खांब उभारणीचे काम सुरू असून यासोबतच वीज पुरवठा इतर वाहिनीवरून पर्यायी मार्गाने  सुरू करण्याचे काम चालू आहे. ५ रोहीत्रांचा वीज पुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात येईल, असे महावितरणने कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790