नाशिक: महापारेषणचे एक पॉवर ट्रान्सफॉर्मर पुनर्स्थापित करण्याचे काम सुरु !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): महापारेषणच्या एकलहरे येथील २२०x३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातील ५०x३ (१५० एमव्हीए) क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बिघाड झाल्याने या महापारेषणच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणारी नाशिक रोड भागातील महावितरणची उपकेंद्रे सोमवारी पहाटे प्रभावित झाली होती.

मात्र या बाधित उपकेंद्रातील वीज भार व्यवस्थापन करून महावितरण पर्यायी स्त्रोतामधून मागणीनुसार टप्याटप्याने वीज पुरवठा करीत आहे. एकाच वेळी झालेला बिघाड ही अनपेक्षित घटना असून, त्यामुळे पर्यायी इतर महापारेषणच्या व महावितरणच्या उपकेंद्रातून बॅक फिडींग करून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भार व्यवस्थापन करून गरजेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करून उपकेंद्रातील वाहिन्यांना टप्याटप्याने वीज पुरवठा केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790