नाशिक: शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. ३१ मे) दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार !

नाशिक। दि. ३० मे २०२५: महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या ३३/११ केव्ही शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रअंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच अखंडित सेवेसाठी शिवाजीवाडी उपकेंद्र येथे जास्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.३१ मे २०२५) रोजी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असणार आहे.

तसेच महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ मधील द्वारका शाखा अंतर्गत असलेल्या ३३/११ केव्ही टाकळी उपकेंद्र येथून निघणारे ११ केव्ही उत्तरा नगर, पूणे रोड या वाहिनीवरील तसेच राणेनगर शाखा अंतर्गत असलेल्या पाथर्डी उपकेंद्र येथून निघणाऱ्या ११ केव्ही राजीव नगर व इंदिरानगर या विद्युत वाहिन्यांचे बदल व देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवारी ३१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

भारत नगर, दिपाली नगर, शनी मंदिर, क्यूरी मानवता, कल्पतरू, बाबा नगर या ११ केव्ही विद्युत वाहिन्या आणि ३३ केव्ही अशोका हॉस्पिटल या वाहिन्यांवरील भागाचा वीज पुरवठा खंडित असणार आहे.

👉 यामध्ये दिपाली नगर वाहिनीवरील: दिपाली नगर, विनय नगर, गणपती नगर, काळे मळा, सुचिता नगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, परब नगर, बापु बंगला, साईनाथ नगर, अशोका हॉस्पिटल रोड या भागाचा समावेश असणार आहे. तसेच भारत नगर वाहिनीवरील: भारत नगर, शिवाजीवाडी, रहनुमा नगर, ममता नगर, जयदीप नगर, चीस्तीया कॉलनी, खोडे नगर, रहेमत नगर, गणेश नगर, वडाळा गाव, मिल्लत नगर, अजमेरी कॉलनी व परिसर.
👉 शनी मंदिर वाहिनीवरील: शनी मंदिर, सुचिता नगर, आदर्श कॉलोनी, कमोद नगर, प्रसन्न कॉलनी, गीतांजली कॉलनी व परिसर.
👉 कल्पतरू नगर वाहिनीवरील: अशोका मार्ग, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, खोडे नगर, गोदावरी नगर, पं. रविशंकर मार्ग, तसेच क्युरी मानवता हॉस्पिटल व अशोका हॉस्पिटल या या परिसराचा समावेश असणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

👉 त्याचप्रमाणे राणे नगर कक्ष अंतर्गत असलेला भाग: यामध्ये अशोका मार्ग, कल्पतरू नगर लेन नंबर १, २ व ३ गणेश बाबा नगर, रविशंकर मार्ग, पायनर हॉस्पिटल, सुविचार हॉस्पिटल व परिसर याचा समावेश आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

👉 द्वारका कक्ष अंतर्गत: भारत इन्कलेव सोसायटी, गुरुगोविंद सिंग कॉलेज, सराफ नगर, कैलास नगर, आदित्य हॉल परिसर, सिमेन्स कॉलनी, सदिच्छा नगर, वनवैभव कॉलनी, सुदर्शन लॉन्स व परिसर, राजीव नगर, श्रद्धा विहार व श्रद्धा गार्डन, इंदिरानगर या भागाचा समावेश आहे.

रोहित्र क्षमता वाढ करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here