नाशिक। दि. १८ जुलै २०२५: महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या विल्होळी कक्षाच्या भागात येणाऱ्या ३३/११ केव्ही सारूळ विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच अखंडित वीजपुरवठ्यासाठी सारूळ विद्युत उपकेंद्र येथे अतिरिक्त क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यात येणार आहे.
त्यामुळे शनिवारी (दि. १९ जुलै २०२५) रोजी सकाळी ०७ ते रात्री १० या वेळेत वीज पुरवठा बंद असणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यादरम्यान या विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ११ केव्ही एनटीसी, विजयानंद, सपट, राजूर, जेटेक्स आणि ३३ केव्ही इंदूरवाला या वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित असणार आहे. यामध्ये राजुर, पिंपळद, आंबेबहुला, रायगड नगर, सारूळ या भागाचा समावेश आहे. विद्युत रोहित्र क्षमतावाढ करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.