नाशिक: मनुष्यबळ विवरणपत्रासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): खाजगी क्षेत्रात २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, कारखाने आणि सेवायोजन कार्यालयांना मनुष्यबळ विवरणपत्र सक्तीचे आहे. त्यानुसार विवरणपत्र ई-आर-१ मार्च २०२४ हे ३० एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

नियोक्त्यांच्या लॉग-इनमध्ये हे विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. नियोक्त्यांनी डिसेंबर २०२३ या तिमाहीचे

विवरणपत्र ३० एप्रिल पर्यंत ‘विवरणपत्र इ-आर-१’ सादर करणे गरजेचे आहे. यासाठी, https://rojgar.mahaswayam.gov.in वेबसाइट ओपन करुन ‘एम्प्लॉयर’ (लीस्ट अ जॉब) वर लॉग इन करून ईआर रिपोर्टमधील इ-आर-१ या ऑप्शनवर सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करता येणार असल्याचे उद्योजकता मार्गदर्शनचे सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790