नाशिक: कचरा वर्गीकरण न केल्याने २,५०० नागरिकांकडून दंड वसूल

नाशिक। दि. २०ऑक्टोबर २०२५: महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

२९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सहा विभागांतील एकूण २,५१६ नागरिकांना नोटीस देण्यात आल्या असून, तब्बल २ लाख ४३ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे नागरिकांना घरगुती ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

तरीदेखील काही नागरिकांकडून या निर्देशांकडे दुर्लक्ष होत असल्याने मनपाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कचरा वर्गीकरण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, पर्यावरणपूरक शहर घडवण्यासाठी प्रशासन व नागरिकांचा संयुक्त सहभाग आवश्यक आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790