नाशिक (प्रतिनिधी): कॉलेजरोडवरच्या ज्वेलरी दुकानातील महिला सेल्समनने ११ लाख ७० हजार रूपये किमतीचे हिरे जडित दागिने लंपास केले.
काजल अविनाश आहेर (२३ रा.गुरूद्वाराजवळ,नाशिक) असे दागिणे चोरुन नेणा-या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जिनेंद्र अजित शहा (रा. कॉलेजरोड) यांनी फिर्याद दिली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांचे कॉलेज रोडवरील समर्थ ज्युस सेंटर समोर तेजस्वी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गेल्या अनेक वर्षापासून सदर महिला सेल्समन म्हणून काम पाहते. ६ मे ते १७ जून दरम्यान सदर महिलेने मालकाचे व अन्य कामगारांचे लक्ष नसल्याची संधी साधून दुकानातील सुमारे ११ लाख ७० हजार रूपये किमतीचे हिरे जडीत अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
गेल्या काही दिवसात नोकरच चोरी करत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे त्याचा फटका प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही बसतो आहे. त्यांच्याकडे सुध्दा संशयाने बघितले जाते. कॉलेजरोडवरील ज्वेलरी दुकानातील महिला सेल्समनने ११ लाख ७० हजार रूपये किमतीचे हिरे जडित अलंकार चोरुन नेल्याच्या या घटनेमुळे सराफ दुकानांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790