नाशिक: भागवत बंधू अपहरण प्रकरणातील संशयिताला पुण्यातून अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गुंतवणूकदारांना दामदुप्पटीचे आमिष दाखवून २० कोटींना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित विष्णू भागवत व त्याचा भाऊ रूपचंद रामचंद्र भागवत यांना जिल्हा न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडतानाच ४ महिन्यांपूर्वी झालेल्या अपहरणप्रकरणी अखेरीस मुख्य संशयित राकेश आबालाल सोनार (रा. चुंचाळे शिवार) यास पुण्यात अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील ४६७ धोकेदायक इमारतींचे वीज, पाणी खंडित होणार !

या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या भागवत यांची २८ फेबुवारीला न्यायालयात तारीख असल्याने दोघे बंधू हजर झाले होते. तिथून ते बाहेर पडत असतानाच रूपचंद व विष्णू भागवत या दोघांचे अपहरण करून त्यांच्याकडे ४.१० कोटीची खंडणी मागण्यात आली. दोघांना कारमध्ये डांबून त्र्यंबकेश्वर, वाडीक्हे, मुंबईमार्गे नेत दोघांना जिवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. संशयितांनी रूपचंद यास सोडून दिले तर विष्णू भागवत यास सोबत ठेवले. सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी विष्णु भागवत यालाही सोडले. गुन्हे शाखेने तपास करून त्याचवेळी संशयित वेदांत दत्तात्रय येवला (रा. अशोकनगर, सातपूर) यास पकडले होते. त्यानंतर गुंडाविरोधी पथकाने हिंजवडीत राहणाऱ्या संशयित राकेश सोनारला नाशिकला आणले आहे.

हे ही वाचा:  नाशिकसह राज्यात दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता

मध्य प्रदेशातून पुण्यात: संशयित सोनार हा नाशिकहून फरार झाल्यानंतर मध्य प्रदेश, मुंबई व पुणे येथे गेला. पुणे येथील हिंजवडी भागात त्याने जुन्या वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला. मात्र शहर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तेथे जात भाडेतत्त्वाने रहात असलेल्या ठिकाणी सापळा रचून पकडले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790