
नाशिक: कापडणीस पिता पुत्र खू’न प्रकरणी महत्वाची अपडेट…
नाशिक (प्रतिनिधी): मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस (रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांच्या खू’न प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून संशयितांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांनी १२०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
बुधवारी (दि. ११) तपासी अधिकारी साजन सोनवणे यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले.
माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांची त्र्यंबकेश्वर, म्हसरुळ आणि शहरातील मालमत्ता हडप करण्यासाठी मुख्य संशयित राहुल जगताप याने साथीदार प्रदीप शिरसाठ, सूरज मोरे, विकास हेमके यांच्या मदतीने नानासाहेब आणि डॉ. अमित कापडणीस यांचा खू’न केला.
नानासाहेबांचा मृ’तदेह मोखाडा, अमितचा मृ’तदेह राजूर येथे न’ग्ना’वस्थेत जा’ळून टाकला.
नानासाहेबांच्या मुलीने वडिलांच्या फोनवर संपर्क साधला असता संशयित राहुलचे बिंग फुटले. पोलिसांत मिसिंग दाखल झाल्यानंतर हा गंभीर गुन्हा उघडकीस आला.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक सोनवणे आणि पथकाने केला. राहुल जगताप यास अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने एकट्याने खू’न केल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने खू’न केल्याची कबुली दिली.
गुन्ह्याचा घटनाक्रम : २८ जानेवारीला कापडणीस पिता-पुत्राची मिसिंग तक्रार दाखल, तपासात नानासाहेब यांच्या शेअर्स खात्यातून ९० लाखांची रक्कम प्रदीप शिरसाठ याच्या खात्यावर वर्ग झाल्याने तपासात राहुल जगतापचे नाव निष्पन्न, नानासाहेबांचा फोन वापरत असल्याचे निष्पन्न, दोन्ही मृ’तदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश, जगतापच्या चौकशीत बंगला, प्लॉट, गाळा हडप करण्याचा उद्देश समोर आला.
शेअर्सच्या पैशातून हॉटेल, ऑनलाइन बूट विक्री, रेंजरोव्हर, पिकअप, मारुती कार खरेदी. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नानासाहेबांचा फोन ठाणे येथे खाडीत फेकला. लहवित येथील घरातून आणि सूर्यकिरण सोसायटी येथील बंगल्यातून कागदपत्रे जप्त केली. फरार असलेल्या तिघा साथीदारांना औरंगाबाद येथे अटक केली. राहुल याने सुपारी दिल्याने खुनाच्या गुन्ह्यात सहभागी झाल्याची कबुली दिली. चौघांच्या चौकशीत खू’न कसे केले याचा क्राइम सीन उभा केला. अतिशय शांत डोक्याने कट रचून खू’न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत.
संशयित राहुलने सावरकरनगर येथील कापडणीस यांचा बंगला, द्वारका येथील गाळा, नानासाहेब यांच्या पैशाने घेतलेले गो फिश हॉटेल आणि सुमारे १२ लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. तसेच महागडी कार, पिकअप, कार, नानासाहेबांची दुचाकी आणि दोन्ही पत्नींकडून महागडे मोबाइल व रक्कम जप्त केली.
![]()


