नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अहिंसा तसेच सुंदर नाशिक हरित नाशिकचा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये 31 मार्च रोजी ‘जीतो अहिंसा रन’ आयोजित करण्यात आले आहे.
मागील वर्षी या रनला सुरवात झाली होती त्यावेळी 5 हजार स्पर्धक धावले होते. मागील वर्षी 3 वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली असुन यंदा या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. 14 वर्षांवरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. ( जीतो चे 68 चैप्टर आणि 22 आंतरराष्ट्रीय चैप्टर) यांनी आपापल्या शहरातून रविवार, 31 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता, 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी अहिंसा रन आयोजित करण्यात आल्याची माहिती जीतो नाशिकचे चेयरपर्सन अँड. सुबोध शहा, सौ. कल्पना पटणी, हर्षित पहाडे यांनी दिली.
या अहिंसा रन नशिकचे स्थानिक मुख्य प्रायोजक ललित रुंग्टा ग्रुप व् सहप्रायोजक ऋषभ इन्स्ट्रुमेंटस लिमिटेड आहेत. सदरची अहिंसा रन गोल्फ क्लब येथून सुरु होऊन 3 कि.मि. सिबल होटल, 5 कि.मी. एबीबी सर्कल, 10 कि.मी. सातपुर अश्या तिनही स्पर्धा रिटर्न गोल्फ क्लब येथे होणार आहे. स्वच्छ नाशिक, हरित नाशिकसाठी सर्व नाशिककरांनी अहिंसा रनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जीतो नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही ’अहिंसा रन’ केवळ एक समुदायापुरती मर्यादित नसून जगभरातून अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना यात आमंत्रित करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांसाठी टी-शर्ट, मेडल आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिक माहिती सोशल मीडिया वेबसाइट ahimsarun.com आणि जीतो चॅप्टर, बिज़नेस बे, तिड़के कॉलनी येथे नोंदणीकरता येईल. असे आवाहन संदिप पहाडे, वैशाली जैन, मीता मुथा, मनीषा चोपडा यांनी केले आहे.
जिथे आज संपूर्ण जगात हिंसाचार होत आहे, तिथे अहिंसा हाच एकमेव उपाय मानला जातो, हे निश्चितच खरे आहे. हिंसा ही केवळ शारीरिक नसून ती मानसिकही असू शकते आणि ती केवळ मानवजातीसाठीच नाही तर प्रत्येक जीवाशी असू शकते. प्रेम, क्षमा, त्याग ही सर्व अहिंसेचीच रूपे आहेत आणि जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश तसेच सुंदर नाशिक हरित नाशिकचा संदेश प्रसारित करण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे यंदाही जीतो द्वारे अहिंसा रनच्या रूपात एक पुढाकार घेण्यात आला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790