नाशिक: नाशिक शहरात कोरोनाचा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाचा मरकजशी काहीही संबंध नाही. हा रुग्ण खासगी कामानिमित्त निजामुद्दीनला गेला होता आणि २१ तारखेच्या दरम्यान परत आला होता. ४ एप्रिलला या रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. त्याचे अहवाल पोझीतीव्ह आले आहेत. हा रुग्ण गोविंद नगर भागातील आहे. गोविंद नगर भागात कोरोनाचा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. म्हणजेच प्रतिबंधित करण्यात आला आहे. हा रुग्ण राहत असलेल्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. त्यानुसार सुमंगल को. ऑप. सोसायटी, मनोहर नगर, गोविंद नगर केंद्रस्थानी ठेऊन खाली दिलेल्या नकाशातील अधोरेखित क्षेत्र हे 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.
त्यानुसार या क्षेत्रातील कुणीही व्यक्ती 14 दिवस बाहेर जाऊ शकणार नाही किंवा कुणीही बाहेरील व्यक्ती आत येऊ शकणार नाही. दरम्यान या कोरोना रुग्णाशी संपर्कात आलेल्यांपैकी 4 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एक अहवाल प्रलंबित आहे..
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागणी एकूण २२ टीम तयार केल्या असून या परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या परिसरात अंदाजे १५५० घरे असून एकूण लोकवस्ती ४००० एवढी आहे. या पथकाने काल १८१० घरांना भेटी दिल्या आणि आज १११० घरांना भेटी दिल्या. यात एकूण ३८९५ व्यक्ती तपासण्यात आले असून एकही संशयित आढळला नाही.