नाशिक। दि. ४ ऑगस्ट २०२५: अकरावी प्रवेशाची पाचवी फेरी आज, सोमवार (दि. ४) सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. ‘ओपन टू ऑल’ या नावाने होणाऱ्या या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम आणि अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती करण्याची व नव्याने नोंदणीची संधी देण्यात आली आहे.
ही प्रक्रिया ५ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३० पर्यंत चालेल. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरतील. या पाचव्या फेरीतील विद्यार्थ्यांची निवड यादी व महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांची माहिती ६ ऑगस्टला सकाळी १० वाजता जाहीर केली जाईल.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790