नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): प्लॉटची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करण्याच्या व्यवहारापोटी पाच लाख रुपयांची टोकन रक्कम घेऊन वृद्धेची फसवणूक करणाऱ्या तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जयश्री सतीश कोल्हटकर (वय ७८, रा. सिद्धांचल बिल्डिंग, डॉ. आंबेडकर रोड, माटुंगा, मुंबई) यांचा गंगापूर शिवारात सर्व्हे नंबर ६५/२/ब मधील प्लॉट नंबर ५९ हा त्यांच्या मालकीचा व कब्जेवहिवाटीतील आहे. दरम्यान, आरोपी देशमुख, सूर्यवंशी व त्यांचे इतर साथीदार यांनी संगनमत करून कोल्हटकर यांच्या प्लॉटच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून श्री. बागमार यांना विक्री करण्याचा व्यवहार केला, ३ तसेच बागमार यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून ५ लाख रुपये स्वीकारून त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तीन ते चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५३/२०२४)