नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२५: महाराष्ट्रातील नाशिक शहरात २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौकाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी २१४ कोटी रुपयांच्या तरतुदीसह प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरील संदेशातून दिली.
द्वारका चौक हा नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या चौकाच्या सुधारणा प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण अत्यावश्यक असल्याचे सांगत, हा प्रकल्प नाशिकच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. या मंजुरीमुळे नाशिककरांना दिलासा मिळणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल अपेक्षित आहे.
![]()

