नाशिक। दि. १० नोव्हेंबर २०२५: शहरासह ग्रामिण भागातसुद्धा थंडीचा जोर वाढू लागला आहे. आज (दि. १०) निफाडमध्ये किमान ९.५ अंश, तर नाशिक शहरात १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग आता वाढल्यामुळे हे वारे थंडीची तीव्रता मध्य महाराष्ट्रात वाढविणारे ठरणार आहेत. दोन दिवसांच्या तुलनेत आकाश रविवारी अधिक निरभ्र राहिले. निफाडमध्ये आज सकाळी ९१ टक्के, तर शहरात ७४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता मोजण्यात आली.
नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपताच थंडीची तीव्रता आता वाढू लागली आहे. किमान तापमानात घसरण सुरू झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पारा अधिक घसरण्याची चिन्हे आहेत. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. पारा सरासरीच्या दोन-चार अंशांनी खाली येणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
![]()
