नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९८ हजार ४३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार २९१ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत १ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २००, चांदवड ६०, सिन्नर २८२,दिंडोरी ८२, निफाड २९०, देवळा २३, नांदगांव ८८, येवला ०८, त्र्यंबकेश्वर ०८, सुरगाणा ०२, पेठ ००, कळवण १८, बागलाण १२८, इगतपुरी १२, मालेगांव ग्रामीण १८ असे एकूण १ हजार २१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८९८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १४८ तर जिल्ह्याबाहेरील २६ असे एकूण ३ हजार २९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ३ हजार ५६० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३.६४, टक्के, नाशिक शहरात ९५.८६ टक्के, मालेगाव मध्ये ९२.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३२टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ६९५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९२१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हा बाहेरील ४३ अशा एकूण १ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. ८ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)