जिल्ह्यात आजपर्यंत ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३२  हजार १३६  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ४१४, चांदवड ५२, सिन्नर ४४५, दिंडोरी ७२, निफाड ४५८, देवळा ७८,  नांदगांव २७१, येवला ६९, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा ०६, पेठ ०६, कळवण १०,  बागलाण १९५, इगतपुरी ७४, मालेगांव ग्रामीण ३०१ असे एकूण २ हजार ४८७  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ३४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६९  तर जिल्ह्याबाहेरील १८ असे एकूण ७ हजार ४१७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४० हजार ४५३ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.३३,  टक्के, नाशिक शहरात ८२.४४ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.६०  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.१३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७९.४४ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २५४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५०९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११३ व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. ४ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790