नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ४३३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत ९६४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५६८  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  Breaking: निफाड परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३२,  बागलाण २४, चांदवड ३२, देवळा २२, दिंडोरी २३, इगतपुरी १३, कळवण ०१, मालेगाव २६, नांदगाव १४, निफाड ८४, पेठ ००, सिन्नर १५१, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०३, येवला ३० असे एकूण ४५५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४६३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४० तर जिल्ह्याबाहेरील ०६  रुग्ण असून असे एकूण ९६४  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ९६५  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: खळबळजनक! सततच्या त्रासाला कंटाळून पित्यानेच सुपारी देवून मुलास धाडले यमसदनी

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९७.०२ टक्के, नाशिक शहरात ९८.०७  टक्के, मालेगाव मध्ये ९६.८५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार १२२  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९६३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५६८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बेमोसमी पावसाचा आज 'ऑरेंज अलर्ट'; पावसासह गारपिटीचा इशारा

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790