नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६६ हजार ३९१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ८ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५१६, चांदवड १३९, सिन्नर ७२६, दिंडोरी २६१, निफाड ९२७, देवळा १२३, नांदगांव २२०, येवला ९३, त्र्यंबकेश्वर १२३, सुरगाणा ३२, पेठ २३, कळवण १२७, बागलाण २१८, इगतपुरी २३०, मालेगांव ग्रामीण २५२ असे एकूण ४ हजार १० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ५१८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४७६ तर जिल्ह्याबाहेरील १११ असे एकूण ८ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ७५ हजार ८७६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७७.८९, टक्के, नाशिक शहरात ९१.७३ टक्के, मालेगाव मध्ये ८३.१४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७२.०९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.५० इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४५०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७३८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५४ व जिल्हा बाहेरील २८ अशा एकूण १ हजार ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.