नाशिक जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा आणि इतर निर्बंधांबाबत अतिशय महत्वाची बातमी…

नाशिक जिल्ह्यातील दुकानाच्या वेळा आणि इतर निर्बंधांबाबत अतिशय महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली आज (दि. २ ऑगस्ट) जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. उद्यापासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. तर रविवारी लॉकडाऊन हा कायम राहील.

हे ही वाचा:  नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; ९८ लाख रुपयांची फसवणूक

राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.  त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे.

उर्वरित जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकान उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकानेच सुरु राहतील. वॉकिंग सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडे राहतील.

हे ही वाचा:  नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; ९८ लाख रुपयांची फसवणूक

नव्या नियमावलीनुसार काय सुरु, काय बंद?
शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व सार्वजनिक उद्याने आणि मैदाने व्यायामाच्या उद्देशाने खुली ठेवता येणार. सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येणार आहेत. मात्र शक्य असेल्यास वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावं. सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार आहे.
व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरु 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. मात्र एसीचा वापर करता येणार नाही. रविवारी ही सेवा बंद राहणार. सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २ ऑगस्ट २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; इतके मृत्यू

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group