नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ३५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ७५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २२३, चांदवड ०७, सिन्नर ८८, दिंडोरी ५३, निफाड १३४, देवळा ०२, नांदगांव ८७, येवला २७, त्र्यंबकेश्वर २७, सुरगाणा ०८, पेठ ०३, कळवण १०, बागलाण २८, इगतपुरी १२३, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ८६१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७६१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८५ तर जिल्ह्याबाहेरील ४३ असे एकूण २ हजार ७५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ४९१ रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ८७ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २०५ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८२ व जिल्हा बाहेरील १६ अशा एकूण ३९० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
(वरील आकडेवारी सोमवारी (दि. २० जुलै २०२०) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)