नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ७ मार्च) ५६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी नाशिक मनपा: ३१४, नाशिक ग्रामीण: १८९, मालेगाव मनपा: ४९, जिल्हा बाह्य: ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर नाशिक ग्रामीण मध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता २८६३ इतकी झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि. ८ मार्च) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ८१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ९४६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ७१, चांदवड १५, सिन्नर ८५, दिंडोरी ४३, निफाड १४७, देवळा २४, नांदगांव ११६, येवला ३४, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण ०६, बागलाण ३९, इगतपुरी २५, मालेगांव ग्रामीण २७ असे एकूण ६५५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८६३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३९० तर जिल्ह्याबाहेरील ३८ असे एकूण ३ हजार ९४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २५ हजार ८९५ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९५.८९ टक्के, नाशिक शहरात ९५.२६ टक्के, मालेगाव मध्ये ८९.३६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.०६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ८५१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७७ व जिल्हा बाहेरील ५८ अशा एकूण २ हजार १३४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.