नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २९ मार्च) मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ; २५ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २९ मार्च) २८४७ इतक्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या झालेल्या वाढीत नाशिक शहर: १६५८, नाशिक ग्रामीण: ९८१, मालेगाव: १७५ तर जिल्हा बाह्य: ३३ असा समावेश आहे.

कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: ५, मालेगाव: ३ तर नाशिक ग्रामीण: १७ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २९ मार्च) आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790