नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २४ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी २६३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५६, नाशिक ग्रामीण: २०४ तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकूण २४९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आज रोजी आज रोजी पोर्टल वर अपडेट कोरोनामुळे एकूण मृत्यू -58 (नाशिक मनपा-21,मालेगाव मनपा- 00, नाशिक ग्रामीण-37, जिल्हा बाह्य- 00) असे आहेत. नाशिक शहरात अनलॉक झाल्यापासून वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाचीसुद्धा चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिक ४ वाजेनंतरही दुकाने सुरु ठेवत असल्यामुळे गुरुवारी महापालिकेने धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.