नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ५० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ३६, नाशिक ग्रामीण: ९, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या जरी आटोक्यात असली तरीही, नागरिकांनी अजूनसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. नाशिक शहरातील अनेक बाजारपेठांमध्ये अनेक नागरिक बिना मास्क फिरतांना दिसत आहेत. नाशिककरांनो, स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करा…
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिकला आलेल्या मावस सासूवर जावयाचा बलात्कार
नाशिकला दुर्दैवी घटना; पुरस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या नाट्यकलावंताचा अपघाती मृत्यू
बापरे: नाशिकच्या ‘ह्या’ तालुक्यात थंडीचा कहर; इतकं होतं तापमान