नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३ एप्रिल) 4596 इतक्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यात नाशिक शहर: २१७५, नाशिक ग्रामीण: २२४७, मालेगाव: १३०, जिल्हा बाह्य: ४४ असा समावेश आहे.
तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १५, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: ३३ आणि जिल्हा बाह्य: ०० असा समावेश आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)सातपूर,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष, २) तळे नगर,रामवाडी, पंचवटी येथील ३७ वर्षीय पुरुष व्यक्ती, ३) फ्लॅट क्र.६२,ओमकार नगर,पेठरोड,पंचवटी येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्ती, ४) शिवपुरी चौक,सिडको येथील ७१ वर्षीय वृद्ध महिला, ५) ९,साई भक्तीअपार्टमेंट, कर्वे नगर,पाथर्डी फाटा येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, ६) आडगाव,नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, ७) शिवशक्ती नगर,नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, ८) सिडको,नाशिक येथील ५९ वर्षीय महिला, ९) शिवराम नगर, टाकळी रोड,जेलरोड,नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्ती, १०) फ्लॅट क्र.१,गंध हिरा रेसिडेन्सी,नारायण बापू नगर,स्वामी समर्थ नगर, नाशिक येथील ३९ वर्षीय पुरुष व्यक्ती, ११) राहुल नगर,तिडके कॉलनी, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, १२) आरटीओ ऑफिस,पेठरोड,पंचवटी नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, १३) खुटवड नगर,नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्ती, १४) नाशिक येथील ४८ वर्षीय महिला, १५) जनगौरव हौसिंग सोसायटी, पांडव नगरी, इंदिरानगर,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला यांचा समावेश आहे.