नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८१ हजार ९३७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १२८ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३३३, चांदवड १३२ ,सिन्नर ६७६,दिंडोरी ३०३, निफाड ४२९, देवळा २८, नांदगांव २९०, येवला ११३, त्र्यंबकेश्वर १०४, सुरगाणा १६, पेठ १५, कळवण १११, बागलाण १८२, इगतपुरी १५०, मालेगांव ग्रामीण १६८ असे एकूण ३ हजार ५० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १८५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५४ तर जिल्ह्याबाहेरील १३१ असे एकूण ६ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९० हजार ७० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.८०, टक्के, नाशिक शहरात ९३.२७ टक्के, मालेगाव मध्ये ९२.१३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.३३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.९७ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५७०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६५ व जिल्हा बाहेरील ३६ अशा एकूण १ हजार ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. २१ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)