नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ५९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ८५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २३७, चांदवड ०९, सिन्नर १५४, दिंडोरी ५६, निफाड १५०, देवळा १२, नांदगांव ९६, येवला ४१, त्र्यंबकेश्वर २८, सुरगाणा ०९, पेठ ०३, कळवण १०, बागलाण २३, इगतपुरी १३८, मालेगांव ग्रामीण ४६ असे एकूण १ हजार ०१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८४ तर जिल्ह्याबाहेरील २० असे एकूण २ हजार ८५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ८४१ रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनामुळे झालेले मृत्यू :
नाशिक ग्रामीण ९० ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २१० , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८२ व जिल्हा बाहेरील १६ अशा एकूण ३९८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.