नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८१ हजार ३७८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ६ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३७३, चांदवड १६८, सिन्नर ७१९, दिंडोरी २९७, निफाड ४६५, देवळा ३२, नांदगांव २७८, येवला ११४, त्र्यंबकेश्वर १२४, सुरगाणा १६, पेठ २०, कळवण ११०, बागलाण २१४, इगतपुरी १३९, मालेगांव ग्रामीण १६३ असे एकूण ३ हजार २३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १७९ तर जिल्ह्याबाहेरील १३४ असे एकूण ६ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ८९ हजार ६३६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.०३, टक्के, नाशिक शहरात ९३.३७ टक्के, मालेगाव मध्ये ९१.५१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.७० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५६८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८४२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६४ व जिल्हा बाहेरील ३६ अशा एकूण १ हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. २० ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)