नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २० जुलै २०२१) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २० जुलै २०२१) रोजी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यात नाशिक शहर: ५३, नाशिक ग्रामीण: २१, तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २० जुलै २०२१) एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३, तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १४६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केल्यानंतरही सायंकाळी ४ नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत अनेक हॉटेल्सच्या मार्फत सर्रास म’द्य विक्री होत आहे. आणि याकडे नाशिक शहर पोलिसांनी कानाडोळा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्बंध पाळणाऱ्या व्यावसायिकांवर हा एक प्रकारचा अन्यायाच आहे.