नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १३ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १३ ऑक्टोबर) कोरोना रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहेत.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १३ ऑक्टोबर) एकूण ९४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ४४, नाशिक ग्रामीण: ४६, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १९९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ६६६ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
👉 नाशिक: तलवारीने केक कापायला गेले, सेलिब्रेशन झालं पोलीस कोठडीत..
👉 पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात नाशिकचे तीन तरुण जागीच ठार
👉 नाशिक कोर्टात पार्किंगवरून वाद; वकील आणि पोलिसांना धक्काबुक्की: ३ जणांवर गुन्हा दाखल